आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीत जेष्ठांशी संवाद

मोदी @ 9 अभियानांतर्गत कणकवलीत राबवला उपक्रम
मोदी @ 9 अभियान अंतर्गत कणकवली येथे जेष्ठ कार्यकर्ता संवाद कार्यक्रम आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी नरेंद्र मोदी यांच्या सरकार च्या 9 वर्ष च्या काळात केलेल्या विकास कामसंदर्भात माहिती देण्यात आली. ,व जेष्ठांच्या समस्या ही जाणून घेण्यात आल्या. यावेळी जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे,तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,माजी उप नगराध्यक्ष बंडू हर्णे,माजी नगरसेवक शिशिर परुळेकर,शहराध्यक्ष अण्णा कोदे,दादा कुडतरकर,मनोहर पालयेकर,नामदेव जाधव,प्रभाकर बाक्रे,राजस रेगे,सुरेश पाटकर,मंगेश मसुरकर आदी उपस्थित होते. यावेळी आमदार नितेश राणे यांनी उपस्थितांशी संवाद साधत मार्गदर्शन देखील केले.
कणकवली प्रतिनिधी





