विद्यूत समस्यांबाबत आचरा व्यापारयांची विजकार्यालयावर धडक

चार दिवसात समस्यांचे निराकरण न झाल्यास आंदोलनाचा इशारा
आचरा–अर्जुन बापर्डेकर
वारंवार खंडीत होणारया वीज पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या आचरा व्यापारयांनी गुरुवारी आचरा बाजारपेठ येथील कार्यालयावर धडक देत विद्यूत मंडळ अभियंत्याना लेखी पत्र देत चार दिवसात विद्यूत समस्यांचे निराकरण न झाल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा दिला.
यावेळी व्यापारी संघटना अध्यक्ष वामन आचरेकर, जेरान फर्नांडिस, मंगेश टेमकर, अर्जुन बापर्डेकर,जयप्रकाश परुळेकर, राजन पांगे,निखिल ढेकणे,सिदार्थ कोळगे,आशिष बागवे, वाघ काका मुणगेकर, भाई नलावडे यांसह अन्य व्यापारी बहुसंख्येने उपस्थित होते.
आचरा परीसरात गेले काही दिवस वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. याचा फटका व्यापारी वर्गाला बसत असून नुकसान सहन करावे लागत होते. यामुळे संतप्त आचरा व्यापारी वर्गाने गुरुवारी दुपारी आचरा बाजारपेठ येथील विद्यूत कार्यालयावर धडक देत उपस्थित
उपकार्यकारी अभियंता अतुल पाटील यांना जाब विचारला.यावेळी विद्यूत कर्मचारयांचे फोन बंद असणे,आचरा सबस्टेशनला पुरवठा होणारया तळेबाजार,विरण लाईन ला कायम निर्माण होणारया समस्यांबाबत पाटील यांना जाब विचारत समस्यांचे चार दिवसात निराकरण नकेल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा दिला. यावेळी पाटील यांनी सर्व ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.