आचरा ग्रामपंचायत तर्फे योगा दिवस साजरा

योग प्रात्यक्षिकांना उत्स्फुर्त प्रतिसाद
आचरा–अर्जुन बापर्डेकर
जागतिक योग दिनाच्या औचित्यावर आचरा ग्रामपंचायत तर्फे आयोजित योग प्रात्यक्षिकांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी योगगुरू संजय गोसावी यांनी विविध योग प्रात्यक्षिकांमधून शरीर स्वास्थ्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने झाली यावेळी योगगुरू कृषी अधिकारी संजय गोसावी यांच्या सोबत माजी सरपंच प्रणया टेमकर, ग्रामपंचायत प्रशासक विनायक जाधव, ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम, गुरुदत्त करंगुटकर,ग्रामस्थ अशोक कांबळी कर्मचारी नरेश परब आदी उपस्थित होते.यावेळी गोसावी यांनी सुमधुर गीतांच्या तालावर योगप्रात्यक्षिके घेत उपस्थितांना योगाचे महत्व पटवून दिले





