शिवसेनेत असताना प्रॉपर्टी विकून पक्ष वाढवला असे वेळोवेळी सांगणारे मंत्री दीपक केसरकर आज मतदारसंघांमध्ये मोठमोठे बॅनर लावतात, लाखोंच्या देणग्या वाटतात आता हा पैसा त्यांच्याकडे आला कुठून ?

ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, यशवंत परब, बाबुराव धूरी तसेच तालुका सघटक मायकल डिसोझा याची पत्रकार परिषदेत जोरदार टीका

सावंतवाडी

शिवसेनेत असताना प्रॉपर्टी विकून पक्ष वाढवला असे वेळोवेळी सांगणारे मंत्री दीपक केसरकर आज मतदारसंघांमध्ये मोठमोठे बॅनर लावतात, लाखोंच्या देणग्या वाटतात आता हा पैसा त्यांच्याकडे आला कुठून ? त्यांनी कुठली प्रॉपर्टी विकली की हा सगळा पन्नास खोक्यांचा चमत्कार आहे का अशी टिका ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केली. तर बॅनरबाजी करतांना ज्यांना शिवसेनेचा वर्धापन कधी हे माहीत नाही ते मंत्री केसरकर आज बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चालले हे दुर्दैव असल्याची टीकाही श्री राऊळ यानी केली.
श्री राऊळ यांनी आज येथील शाखेत दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी तसेच वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब यांना सोबत घेत एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. त्याच्यासोबत यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, विनोद ठाकूर, अजित राऊळ,संदीप पेडणेकर आधी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, 19 जून हा दिवस ठाकरे शिवसेनेसाठी काळा दिवस आहे ज्या दीपक केसरकरांनी मतदार संघाच्या विकासासाठी उद्धव ठाकरे शिवसेनेची गद्दारी केली मात्र ज्या गोष्टीसाठी गद्दारी केली तो विकास आज एक वर्ष झाला तरी या मतदारसंघात कुठे दिसून आलेला नाही पर्यटन आरोग्य कवळ्यातदार गावकर प्रश्न रेल्वे टर्मिनस आधी महत्त्वाचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत त्यामुळे त्यांनी नेमका कोणत्या विकास केला हा प्रश्न आहे मुळात जूनच्या पहिल्या आठवड्यात रस्त्याच्या कामाचे नारळ फोडले जातात हाच यांचा विकास म्हणावा लागेल कारण ठेकेदारांना पोचणारे मंत्री केसरकर सत्तेत बसले हे येथील जनतेचे दुर्दैवच आहे. शिवसेनेमध्ये असताना पक्ष वाढवण्यासाठी आपण प्रॉपर्टी विकल्या असे केसरकर नेहमी ओरडत होते परंतु आज ज्याप्रमाणे ते बॅनरबाजी व लाखोंच्या देणग्या वाटत आहेत हे पाहता आताच्या पक्षासाठी केसरकर यांनी नेमक्या कुठल्या प्रॉपर्टी विकल्या हे जाहीर करावे नाहीतर हा त्यांच्या चमत्कार म्हणायचा का? मुळात शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन असताना केसरकर यांनी केलेल्या बॅनरबाजी मध्ये 59 वा वर्धापन दिन असा उल्लेख केला आहे त्यामुळे ज्यांना शिवसेनेचा वर्धापन दिन केव्हा हेच माहीत नाही ते बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातो असे सांगतात हे शिवसैनिकांचे दुर्दैवच आहे.
श्री धुरी म्हणाले सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचाच आहे आणि यापुढे राहणार कारण येणाऱ्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचाच आमदार या ठिकाणी निवडून येणार आणि गद्दारांना शिवसैनिक धडा शिकवणार हे निश्चित आहे तर केसरकरांनी विधानसभेला उभे राहावेच असे आवाहन श्री देसाई यांनी केले.

error: Content is protected !!