राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघात मुंबई उपनगर संघाचा आणि मसुरे सुपुत्र आकाश संतोष मसुरकर याची निवड …

महाराष्ट्र क्रिकेट संघात मुंबई उपनगरच्या एकूण दहा खेळाडूंची निवड…

टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन उत्तर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने सातवी राष्ट्रीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा उत्तर प्रदेश मधील मथुरा येथे २२ जून ते २६ जून या कालावधीमध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर करण्यात आला आहे .

महाराष्ट्र टेनिस क्रिकेट संघामध्ये मुंबई उपनगर संघामधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे – टोकळवाडी गावचा सुपुत्र युवा खेळाडू आकाश संतोष मसुरकर याची निवड झाली आहे. आकाश याच्यासोबतच सिंधुदुर्ग देवगड मधील प्रकाश पराडकर ,सुदेश नारकर,वेदांत जाधव, या सिंधू पुत्राचीही निवड झाली आहे. तसेच मुंबईच्या अभिषेक मोडकर,
उत्कर्ष जुवाटकर,अभिषेक सांगळे,रोहन चव्हाण,तन्मय बांदेकर,मानस पाटील या खेळाडूंची निवड केली आहे. अशी माहिती महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन मुंबई सचिव श्री संदीप पाटील यांनी दिली.
आकाश मसुरकर हा मालवण तालुक्यातील मसुरे गावातील टोकळवाडी या भूमीचा सुपुत्र असून जिल्हा, राज्य, मुंबई, बेळगाव, गोवा , सिंधुदुर्ग येथील विविध स्पर्धेत मध्ये आपल्या फलंदाजीच्या जोरावरती नाव लौकिक मिळविला होता. आक्रमक फटकेबाज फलंदाज म्हणून अल्पावधीतच आकाशाने टेनिस क्रिकेट विश्वात नावलौकिक मिळविला आहे. तसेच महाराष्ट्र टेनिस क्रिकेट संघात स्थान मिळवणारा आकाश हा मसुरे गावचा पहिला खेळाडू आहे.
निवड झालेल्या खेळाडूंना १८ जून ते २० जून रोजी नाशिक येथील मोदी मैदान या ठिकाणी मुंबई महाराष्ट्र विदर्भ या संघांची सराव चाचणी होणार आहे. सराव चाचणी घेण्यासाठी महाराष्ट्र सचिव मीनाक्षी गिरी,महाराष्ट्र टेक्निकल डायरेक्टर स्वप्निल ठोंबरे, विजय उंबरे, महेश मिश्रा, इंद्रजीत, संदीप पाटील, सिद्धेश गुरव, सुशील तांबे उपस्थित राहणार आहेत.
मुंबई, सिंधुदुर्ग सहित अनेक क्षेत्रांमधून खेळाडूंचे अभिनंदन केले जात आहे .अखिल भारतीय गाबीत समाज संस्था अध्यक्ष श्री परशुराम उपरकर,कार्याध्यक्ष श्री दिगंबर गावकर, उद्योजक डॉ. दीपक परब, उद्योजक दीपक सावंत, अखिल भारतीय कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोसावी, उद्योजक निनाद धुरी, भारतीय जनता पक्षाचे डोंबिवली ग्रामीण विभागाचे अध्यक्ष नंदू दादा परब,मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, मर्डे सरपंच संदीप हडकर, माजी जि प अध्यक्ष संग्राम प्रभू गावकर, माजी जि प अध्यक्ष सरोज परब, समाजसेवक प्रकाश परब, महेश बागवे, विलास मेस्त्री, सलीम सय्यद, प्रफुल पाटील,श्री बबन सारंग,श्री गणेश फडके,श्री.धनंजय मुणगेकर,श्री.विष्णू प्रभू,श्री.अमित गोलतकर,श्री.संतोष कडू,श्री.राजेश पावसकर,
श्री. विश्वास घाग,श्री.संजय नलावडे,श्री. प्रशांत भाबल,
श्री.दत्ता पोसम,श्री.गणेश कुबल,श्री. उमेश येरागी,श्री.दीपक ढोके, त्याचबरोबर सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशन सिंधुदुर्ग जिल्हा या सर्वांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या आहेत. आकाश मसुरकर याला त्याचे वडील प्रसिद्ध भजनी बुवा, समाजसेवक संतोष मसुरकर यांचे मार्गदर्शन लाभले…

मसुरे प्रतिनिधी

error: Content is protected !!