कणकवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जागतिक खोके दिन साजरा

हातात खोके घेऊन ५० खोके एकदम ओकेच्या दिल्या घोषणा

मुंबई येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिबिरात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी २० जून हा जागतिक खोके दिन आहे अशी जोरदार टीका शिंदे गटावर केली होती. त्यापार्श्वभूमीवर आज कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडे शिवसैनिकांनी जागतिक खोके दिन साजरा केला. हातात खोके घेऊन ५० खोके एकदम ओके, गद्दारांना जागतिक खोके दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

        मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे.गेल्या वर्षी २० जून रोजी विधान परिषदेसाठी मतदान संपल्यानंतर रात्रीच एकनाथ शिंदे  १६ आमदारांसह नॉट रिचेबल झाले होते. त्या रात्री ते सूरतमध्ये गेले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  पक्षाच्या वतीने  आज तो दिवस जागतिक खोके दिन म्हणून साजरा करण्यात आला. 
        यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,एस टी कामगार सेना जिल्हाध्यक्ष अनुप नाईक,  कणकवली विधानसभा प्रमुख सचिन सावंत, युवासेना जिल्हा समन्वयक राजू राठोड, उपतालुकाप्रमुख महेश कोदे, राजू पाटील,महेंद्र नाईक,सचाभाई  राणे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!