भाजी विक्रेत्या महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू

राष्ट्र वादी को कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे परब

महिला व युवकांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

सावंतवाडी

प्रत्येक क्षेत्रात महिला आज आघाडीवर आहेत यापुढेही महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे असे आव्हान राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्ष सौ अर्चना घारे परब यांनी आज येथे केले. सावंतवाडी शहरात दररोज भाजी विक्रेते करणाऱ्या महिलांना छत्र्या वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी बोलताना घारे परब म्हणाले.

यावेळी या कार्यक्रमास माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हा अध्यक्ष अमित सामंत, अल्पसंख्याक सेल जिल्हा अध्यक्ष जावेद खतीब, नजीर शेख,सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलीक दळवी, देवेद्र टेबकर, सायली दुभाषी, फिदा इल्ला खान होदाययुल्ला खान, दर्शना बाबर देसाई, काशिनाथ दुभाषी, तसेच कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रम वेळीं झिरंगवाडीतील महिला व युवकांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला .

error: Content is protected !!