ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची तळकटला भेट

हत्ती नुकसानीसंदर्भात लवकरच संयुक्त बैठक घेण्याचे दिले आश्वासन
तळकट कोलझर परिसरातील हत्तींचा वावर व त्यांच्याकडून झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी नुकतीच माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी तळकट गावाला भेट दिली.
तेथील शेतकरी व माजी सैनिक मनोहर सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.यावेळी चंद्रकांत दळवी, नारायण भिसे, पी.पी. देसाई, रामचंद्र सावंत, निळकंठ सावंत, एकनाथ घाडी, विजय भिसे, देवेंद्र देसाई आदी उपस्थित होते.
ब्रिगेडियर सावंत यांनी हत्ती, गवे, माकड आदींच्या त्रासामुळे शेतकरी अडचणीत असल्याने वन अधिकारी, जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले होते. मात्र ठोस काही झाले नाही.आपण आजची परिस्थिती पाहिल्यानंतर निश्चितच शिक्षणमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी,उपवनसंरक्षक मुख्यमंत्री यांच्यापर्यंत आपली बाजू मांडू तसेच लवकरच ओरोस येथे मंत्री, जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी यांची व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले.माजी सरपंच रामचंद्र सावंत यांच्या घरी त्यासंदर्भात चर्चा झाली.
दोडामार्ग l प्रतिनिधी