कणकवली पटवर्धन चौकात वाहतूक पोलिसांकडून तब्बल ४१ हजारांचा दंड

वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांची कारवाई

कणकवली शहरात वाहतूक पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात आली असून, कणकवली पोलीस स्टेशन चे वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांनी पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली चे वाहतूक नियोजन करत असताना ही कारवाई केली. दुचाकी स्वार् तसेच चार चाकी स्वार यांच्यावर वाहतुकीच्या नियमांतर्गत एकूण 52 केसेस करून 41 हजार पाचशे रुपये दंड केला. त्यामध्ये वाहतुकीस अडथळा, दुचाकी वर ट्रिपल सीट, इशारा केला असता थांबले नाही, लायसन नसणे, आणि दुचाकीला आरसे नाहीत दुचाकीस नंबर प्लेट नाही अशा कलमांतर्गत केसेस केलेल्या आहेत.

कणकवली/ प्रतिनिधी

error: Content is protected !!