सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली येथे सापडलं मृत माकड;

जागृत ग्रामस्थांनी तात्काळ दखल घेत मृत माकडाची लावली योग्य विल्हेवाट;-
सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली टेंबवाडी येथे एक माकड मृतावस्थेत आढळले. मृत माकड तेथील ग्रामस्थ रेश्मा नेमण यांच्या दृष्टीस पडले. याची माहिती त्यांनी तेथील ग्रामस्थांना सांगितली.मृत माकडाची माहिती समजताच तेथील ग्रामस्थ रुपेश नाईक,संजय मांजरेकर, अमोल पार्सेकर,प्रणव नेमन,रुपेश पार्सेकर,सुदन पार्सेकर यांनी घटना स्थळी धाव घेत सदरील मृत माकडाला उचलून योग्य त्या पद्धतीने जमिनीत खड्डा खोदून त्यात त्याची योग्य ती विल्हेवाट लावली. तेथील ग्रामस्थांनी एक सामजिक कार्य करून पुढे उद्भवणारा माकड ताप सारखा आजार होऊ नये म्हणून वेळीच उपाय योजना करून एक सामाजिक बांधिलकी जपली.