“फिरकी कार “सदा वराडकर यांचे निधन

गेली काही पिढ्या साप्ताहिक आणि दैनिकातून फिरक्या लिहिणारे सिनेमा नाट्य कलाक्षेत्रातील अधिकारी पत्रकार बहुआयामी व्यक्तिमत्व सदा वराडकर यांचे मालवण मेढा येथे अल्पशा आजाराने आज दुपारी निधन झाले. मृत्यूसमयी ते 85 वर्षांचे होते.
1975 च्या आसपास आणीबाणीच्या काळापासून वराडकर यांनी स्वर्गीय भाईसाहेब खंडाळकर यांच्या जनयुग मधून फिरकी हे सदर सुरू केले. भल्या भल्यांच्या टोप्या उडविणारे हे सदर कमालीचे लोकप्रिय होते त्यानंतर त्यांनी कोल्हापूर बेळगाव चिपळूण येथून निघणाऱ्या दैनिकांमधूनही फिरक्या येणारे सदर चालविले उंडग्याची उंडगे गिरी नाम टोपण नावाने ही त्यांनी अनेक ठिकाणी लेखन केले एकूणच मराठी हिंदी चित्रपट नाट्य क्षेत्रात अधिकारवाणीने लिहू शकणारा वराडकर यांच्यासारखा दुसरा पत्रकार रत्नागिरी सिंधुदुर्गातही दुसरा नव्हता.
प्रचंड व्यासंग असलेल्या या पत्रकाराच्या अंगच्या गुणाचे पुरेसे चीज झाले नाही त्याची प्रतिभा पुरेशी लोकांसमोर येऊच शकली नाही. त्यामुळे सागरचे संपादक निशिकांत जोशी यांनी त्यांचा उल्लेख "शापित यक्ष "असा एकदा केला होता.
सदा वराडकर यांनी महसूल खात्यात नोकरी ही केली परंतु ते सतत पत्रकारिता चित्रपट नाट्य क्षेत्र आधी मध्ये रमलेले असायचे 85 वयोमान उलटूनही अगदी अलीकडे पर्यंत त्यांची तब्येत ठणठणीत होती मात्र गेल्या काही दिवसातल्या आजारांचे निमित्त होऊन त्यांनी हे लोकांचा निरोप घेतला.
सदा वराडकर यांच्या पश्चात पत्नी मुली जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.
सदा वराडकर यांच्या परिवाराचा संपर्क क्रमांक 94 22 54 85 50 असा आहे.
मालवण ब्युरो न्यूज