कलमठ ग्रामपंचायतच्या सर्व सार्वजनिक विहिरींना नवी झळाळी

जलसमृद्ध गाव संकल्प अंतर्गत कलमठ ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम
पावसाळा पूर्व तयारी म्हणून गावातील सर्व गटारे सफाई काम युद्ध पातळीवर
कलमठ गावातील सर्व सार्वजनिक विहिरी गाळ उपसणे , नूतनीकरण करणे ,लोखंडी जाळी बसवणे , रंगरंगोटी करणे ,गटार सफाई करणे अशी पावसाळा पूर्व कामे कलमठ ग्रामपंचायतने 15 वित्त आयोग मधून हाती घेतली असून विहिरी दुरुस्तीचे कामे देखील सुरु आहेत. कलमठ बाजारपेठ येथील तांबट विहीर ,प्रदीप कांबळी घरानजीक विहीर , कुंभारवाडी विहीर , मठकर कॉम्प्लेक्स विहीर दुरुस्ती,गाळ उपसणे व रंगकाम काम पूर्ण झाली असून , लोखंडी जाळी बसवले जाणार आहेत. आज सरपंच संदीप मेस्त्री ,उपसरपंच स्वप्नील चिंदरकर ,ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर,सदस्य नितीन पवार यांनी पाहणी केली . गेल्या 15 दिवसात सरपंच संदीप मेस्त्री स्वतः कर्मचाऱ्या मार्फत गावातील गटारे सफाई करून घेत असून पावसाळा पूर्वी गावातील सर्व गटारे सफाई ,विहिरी नूतनीकरण करण्याचे काम पूर्ण होतील असा विश्वास सरपंच संदीप मेस्त्री व उपसरपंच स्वप्नील चिंदरकर यांनी व्यक्त केला असून ग्रामस्थांनी ग्रामपंचायतने हाती घेतलेल्या कामां बद्दल समाधान व्यक्त केले आहे .
यावेळी जितू कांबळे ,राजू कोरगावकर, प्रदीप कांबळी उपस्थित होते .
कणकवली प्रतिनिधी