आजगाव तिरोडा येथे अनैतिक व्यवसाय : अनेक ग्रामपंचायतींचाआक्षेप

आजगाव तिरोडा परिसरातील एका घरात अनैतिक वेश्याव्यवसाय सुरू असून पोलिसांना निवेदन देऊनहीं दखल घेतली जात नाही अशा तक्रारी आजगाव सह अनेक ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी केली आहे.
आजगाव भोमवाडी तिरोडा नानोस गावच्या सरपंचांनी ही तक्रार केली आहे.नेपाळमधील महिला बाहेरून आणून त्या गिर्हाईकांना पुरविला जातात अशा स्वरूपाच्या या तक्रारी आहेत यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असूनही प्रशासनाच्या वतीने कोणतीच दखल घेतली गेलेली नाही असा ग्रामस्थांचा आरोप आहे.
आजगाव प्रतिनिधी