आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनि.कॉलेज वरवडे इथे ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न

कणकवली/मयुर ठाकूर
ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेत ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य हे फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर तर संपुर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे असे उदगार कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते व संस्थेचे उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत यांनी काढले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आली.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे ,उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत सर,सचिव श्री.हरिभाऊ भिसे,कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल,सहसचिव श्री.निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री.डी.पी.तानावडे,मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.





