दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालयाचे उद्या भूमिपूजन

मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते क्रीडा संकुलाचेही ऑनलाईन भूमिपूजन

✅प्रतिनिधी l दोडामार्ग
तालुक्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरू शकणाऱ्या येथील उपजिल्हा रुग्णालयाचे आणि साटेली भेडशी येथील तालुका क्रीडा संकुलाचे ऑनलाईन भूमिपूजन उद्या (ता.६) सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी ही माहिती दिली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे व साटेली – भेडशी येथील क्रीडासंकुलाचेही भूमीपूजन उद्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले. ह्या दोन्ही विकास कामांचे भूमीपूजन उद्या सकाळी १० वाजता मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ९.३० वाजता या दोन्ही विकासकामांच्या ठिकाणी पुरोहितांच्या हस्ते व वैद्यकीय अधिकारी ज्ञानेश्वर ऐवळे आणि तालुका क्रीडा अधिकारी यांच्या उपस्थितीत विधीवत पूजाअर्चा होणार आहे. तरी तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख गणेशप्रसाद यांनी केले आहे.

error: Content is protected !!