‘ त्या ‘ शेतकऱ्याला दीपक केसरकरांकडून २५ हजारांची मदत

विषबाधेने अकरा शेळ्यांचा झाला होता मृत्यू
✅प्रतिनिधी l दोडामार्ग
कुडासे वानोशी येथील शेतकरी राकेश फाले यांच्या सुमारे अकरा शेळ्या विषबाधेने मृत्युमुखी पडल्या होत्या . त्यांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत आज केली. तसेच सिंधुरत्न योजनेतून शेळीपालनासाठी प्राधान्याने मदत करण्याचे आश्वासनही दिले.आपदग्रस्त शेतकरी राकेश फाले यांच्याकडे आथिर्क मदत सुपूर्द करण्यात आली.यावेळी मंत्री केसरकर यांच्या वतीने शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, उपतालुका प्रमुख दादा देसाई ,युवासेना तालुका प्रमुख भगवान गवस, मणेरी विभाग प्रमुख रामदास मेस्त्री तसेच रामा फाले,नागेश फाले , मेघश्याम देसाई आदी उपस्थित होते.





