माध्यमिक शालान्त परिक्षेत शिरवंडे हायस्कूलची सानिका घाडीगांवकर मराठी विषयात जिल्ह्यात प्रथम

शिरवंडे हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा

संतोष हिवाळेकर पोईप

मार्च 2023मध्ये झालेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी कु. सानिका अजित घाडीगांवकर हीने मराठी विषयात ९९गुण प्राप्त करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठी विषयात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तसेच त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तसेच तिने ८७.60%गुण मिळवून प्रशालेतून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. विशेषतः प्रशालेत मराठी विषयाचे शिक्षक नसताना संस्था मानधनावर नियुक्त केलेल्या श्रीमती प्रणीता गांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे उज्वल यश प्राप्त केले आहे. मराठी विषयात तिला मुख्याध्यापक श्री वामन तर्फे सर यांचेही मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले. तिच्या या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. वामन तर्फे यांनी तिचे व श्रीमती प्रणीता गांवकर यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती अध्यक्ष, सर्व सदस्य, शिक्षक शिक्षकेतर यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!