समीर चांदेरकर यांनी दगडावर साकारला राज्यभिषेक सोहळा

पेंडुर ता. मालवण
कोकणातील गडकिल्ले आजही छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या, मराठ्यांच्या पराक्रमाचे शौर्याचे पोवाडे गात आहेत.याची राजधानी रायगडावर नुकताच 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. याच पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेकाचे २५ सेमी*१२ सेमी आकाराचे हाताने दगडावर सर्वात लहान चित्र रेखाटण्याचा केलेला मालवण चे समीर चांदरकर. यांनी केलेला हा प्रयत्न.!! पेंडूरच्या ( ता.मालवण)तळ्यातील एका दगडावर समीर चांदरेकर यांनी. आपल्या घरीच हे चित्र रेखाटलेले आहे.दगडाचा पृष्ठभाग खडबडीत असल्यामुळे चित्र रंगवताना अनेक अडचणी आल्या. हे चित्र रंगवण्यासाठी ऍक्रेलिक कलरचा वापर केला. चित्र पूर्ण करण्यासाठी जवळपास चार ते पाच तासांचा कालावधी लागला. चित्रातले बारकावे दाखवण्यासाठी 00 नंबरच्या ब्रशचा वापर केला. असे चित्रकार समीर अशोक चांदरकर यांनी सांगितले. शाबासकी साठी समीर चांदरकर यांचा संपर्क क्रमांक9421190383. असा आहे.





