“कोकण नाऊ सुंदरी 2023” पर्व दुसरे ची विजेती ठरली सौन्दर्यवती मिली मिश्रा.

द्वितीय लतिका पाटकर तर तृतीय क्रमांक विभागून ऋतुजा शेलटकर आणि प्राची जोशी.
कोकण नाऊ चॅनल आयोजित, “मालवण महोत्सव 2023” दरम्यान आयोजित करण्यात आली होती “कोकण नाऊ सुंदरी 2023” फॅशन शो स्पर्धा.
मालवण/मयुर ठाकूर.
कोकण नाऊ चॅनलचे संचालक विकास गावकर आणि संचालिका वैशाली गावकर यांच्या माध्यमातून कोकण नाऊ चॅनेल आयोजित “मालवण महोत्सव 2023” नुकताच मालवण येथील बोर्डिंग ग्राउंड येथे संपन्न झाला.यापूर्वी देखील अशाच प्रकारचा महोत्सव कुडाळ येथे संपन्न झाला होता.नंतर सावंतवाडी येथे सुद्धा भव्य दिव्य असा “कोकण नाऊ सावंतवाडी महोत्सव”संपन्न झाला.तर कोकण नाऊ चॅनलचे संचालक विकास गावकर यांच्या माध्यमातून मालवण येथे देखील कोकण नाऊ आयोजित “मालवण महोत्सव 2023” आयोजित करण्यात आला.या महोत्सवामध्ये गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल, आंतरराष्ट्रीय दर्जाचा खाद्य महोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी या महोत्सवादरम्यान आयोजित करण्यात आला होता.दिनांक 25 मे 2023 रोजी “मालवण महोत्सव 2023″चा प्रारंभ झाला आणि पहिल्या दिवसापासून सतत सात दिवस विविध भव्य दिव्य अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम या महोत्सवांमध्ये कोकण नाऊ चॅनलचे संचालक विकास गावकर आणि संचालिका वैशाली गावकर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते.या महोत्सवाच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मालवण वासियांना अनुभवायला मिळाली.याच दरम्यान कोकण नाऊ आयोजित मालवण महोत्सव 2023 चा शेवटचा दिवस अर्थातच 31 मे 2023 रोजी सांगता दिवशी मालवण येथील प्रसिद्ध उद्योजका चारुशीला आडकर पुरस्कृत “कोकण नाऊ सुंदरी” पर्व दुसरे ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती.या स्पर्धेला मालवणवासीयांनी चांगलीच पसंती दिली असून या स्पर्धेचे परीक्षण डॉक्टर गार्गी आरोस्कर आणि प्रसिद्ध उद्योजक नितीन वाळके सरांनी केलं होतं.या स्पर्धेमध्ये प्रेक्षणीय पारितोषिक म्हणून दीपा परब यांना विजेतेपद मिळालं तर फॅशन शो मधील अर्थातच “कोकण नाऊ सुंदरी 2023” मध्ये नियोजित बक्षीसांप्रमाणे बेस्ट कॅट वॉल्क मिली मिश्रा,तर बेस्ट परफॉर्मन्स कृतिका सावजी,तर बेस्ट स्माईल अनिशा सावंत हिला प्राप्त झाले.तसेच या कोकण नाऊ सुंदरी स्पर्धेमध्ये ऋतुजा शेलटकर आणि प्राची जोशी हिला तृतीय क्रमांक देण्यात आला,तसेच मालवण येथील रहिवासी असलेली आणि मालवण तालुक्याची सुपुत्री लतिका पाटकर हिला द्वितीय क्रमांक देऊन गौरविण्यात आले.तर कोकण नाऊ आयोजित “मालवण महोत्सव 2023” च आकर्षण ठरलेली मालवण महोत्सव 2023 मधली स्पर्धा अर्थातच “कोकण नाऊ सुंदरी” या कोकण नाऊ सुंदरीचा मनाचा किताब ज्या स्पर्धकाने पटकाविला ती स्पर्धक म्हणजे मिली मिश्रा.कोकण नाऊ चॅनलचे संचालक विकास गावकर, कोकण नाव चॅनलच्या संचालिका वैशाली गावकर आणि चॅनेल चे ऍडमिन मेघनाथ सारंग तसेच कोकण नाऊ चॅनलचे सेल्स एक्झिक्युटिव्ह मयूर ठाकूर यांसकडून सर्व विजेत्या स्पर्धकांचं कौतुक करण्यात येत आहे.