दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या दोघांचा कलमठ भाजपाच्या वतीने सत्कार

दहावीतील सर्वच गुणवंतांचा सत्कार करणार
सरपंच संदीप मेस्त्री यांची माहिती
दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या आयनेश मालंडकर , श्रिया माळवदे यांचा कलमठ भाजपाच्या वतीने सत्कार करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सरपंच संदीप मेस्त्री ,तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री , भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष प्रज्ञा ढवण ,महेश लाड , उपसरपंच स्वप्नील चिंदरकर , सदस्य नितीन पवार ,दिनेश गोठणकर ,श्रेयस चिंदरकर ,पपू यादव,उदय मालंडकर , शिल्पा मालंडकर ,साक्षी माळवदे , शिवम धानजी ,पंढरीनाथ दळवी आदी उपस्थित होते. सर्व गुणवंतांचा कलमठ ग्रामपंचायतच्या वतीने नागरी सत्कार करणार. अशी माहिती यावेळी सरपंच संदीप मेस्त्री यांनी दिली
दिगंबर वालावलकर /कणकवली