दिगवळेतील बहुप्रतिक्षित रांजणवाडी रस्त्याचे जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

स्वयंभू मंदिराकडील रस्त्याचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते उद्घाटन
दिगवळे ग्रामस्थांमधून व्यक्त करण्यात आले समाधान
गेले अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या दिगवळे रांजणवाडी रस्त्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, दिगवळे सरपंच संतोष घाडीगावकर, शिवसेना विभागप्रमुख आनंद आचरेकर, युवासेना विभागप्रमुख संतोष सावंत, ग्रामपंचायत सदस्य बाळू गावडे व शामसुंदर जाधव तसेच रांजणवाडीतील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. तसेच यावेळी दिगवळे स्वयंभू मंदिर येथील रस्त्याचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हे काम शासकीय ठेकेदार रामदास विखाळे यांनी स्वखर्चाने केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत, दिगवळे सरपंच संतोष घाडीगावकर, शिवसेना विभागप्रमुख आनंद आचरेकर, युवासेना विभागप्रमुख संतोष सावंत, ग्रामपंचायत सदस्य बाळू गावडे, स्वयंभू देवस्थान कमिटीचे अध्यक्ष नाना गावडे, ह. भ. प. संदीप चव्हाण बुवा व दिगवळे गावातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर/ कणकवली