मोती तलावमध्ये रूतलेला युवक अखेर स्वतः च्या प्रयत्नानंतर आला बाहेर

सावंतवाडी
सावंतवाडी येथील मोती तलावाच्या गाळ काढण्याचे काम सुरु असतानाच या दलदलीत एक युवक रुतल्याचा प्रकार घडला आहे. राजवाड्याच्या समोरील भागात भिंत बांधण्याचे काम सुरु आहे. याच भागात तो चालत जात असताना तो दलदलीत रुतला. सिद्धाप्पा चन्नाप्पा बिजी (३५, रा. बेळगांव, सध्या रा. सावंतवाडी) असे त्याचे नाव आहे. आज शुक्रवार रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास प्रकार घडला. त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
दरम्यान, काही कालावधीनंतर त्याने स्वतः उलट्या दिशेने हात पाय मारत तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. अखेर अर्ध्या तासानंतर त्याच्या प्रयत्नांना यश आले आणि तो बाहेर आला.