सावंतवाडी तालुक्याचा 98.61 टक्के निकालमिलाग्रीसचा चैतन्य गावडे प्रथम

सावंतवाडी :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी अर्थात शांलात परीक्षेचा सावंतवाडी तालुक्याचा निकाल ९८.६१ टक्के लागला आहे. सावंतवाडी तालुक्यातून दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या १७२७ विद्यार्थ्यांपैकी १७१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात ९३६ पैकी ९२३ विद्यार्थी तर ७९१ पैकी ७८७ विद्यार्थिनींचा समावेश आहे. यामध्ये तालुक्यात मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडीचा चैतन्य गावडे (९९ टक्के) प्रथम तर कळसूलकर इंग्लिश स्कूलचा पार्थ वाडकर (९७.८० टक्के) व्दितीय तर तृतीय मळगाव हायस्कूलची सुचित्रा धुरी (९७.६० टक्के) गुण मिळविले आहेत.

error: Content is protected !!