विद्यामंदिर हायस्कूल कणकवली चा एस,एस,सी चा निकाल 95.42%

कणकवली/मयुर ठाकूर.
शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली चे विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली यां विद्यालयाचा दहावीचा निकाल हा 95.42 %लागला आहॆ. एस एस सी परीक्षेत 175 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यात 167 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर शेकडा निकाल हा 92.42 % लागला आहॆ. यामध्ये यामध्ये प्रथम क्रमांक श्रीस्वरूप संतोष देसाई याला प्राप्त झाला असून 98% गुण प्राप्त झाले आहेत.तर आयुष चेतन मालपेकर(97.40), साईराज श्रीकृष्ण परब(97.20), पारस अनिल परब(97%),शताक्षी संदीप सावंत 96.40%. वरील विद्यार्थी हे प्रथम पाच विद्यार्थी आहेत.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले आहॆ