नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करूळ हायस्कूल चा निकाल 98.41 टक्के

यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक व संस्थाचालक यांनी केले अभिनंदन
करूळ पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करूळ हायस्कूल चा निकाल 98.41 टक्के लागला आहे. या परीक्षेसाठी प्रशालेतून 63 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील 62 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये खुशी उल्हास राठोड 96, मलिष्का मिलिंद डिसोजा 91.80, ऋतुजा महेश पडवळ ९१.२०, आकांक्षा जनार्दन डिचवलकर 91 टक्के, ओम प्रशांत सापळे 89.20 टक्के मिळवत या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक लक्ष्मण नारकर यांच्यासह संस्था चालकांनी अभिनंदन केले आहे.
कणकवली/ प्रतिनिधी