सेवानिवृत्त प्राथमिक मुख्याध्यापक फ्रान्सिस फर्नांडिस यांचे निधन

घोणसरी ( टेंबवाडी ) गावातील सेवानिवृत्त प्राथमिक मुख्याध्यापक फ्रान्सिस घाब्रू फर्नांडिस यांचे वयाच्या 95 व्या वर्षी वरवडे फणसनगर येथे 26 मे रोजी निधन झाले. घोणसरी गावातील जुन्या पिढीतील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून फर्नांडिस गुरुजी परिचित होते. घोणसरी गावच्या सर्वांगीण विकासात त्यांचे योगदान होते.घोणसरी गावातील हायस्कुल उभारणीत ही त्यांचे योगदान होते. अत्यंत निगर्वी आणि सर्वांशी मिळून मिसळून असणारे सदास्मित व्यक्तिमत्व म्हणून फर्नांडिस गुरुजींची घोणसरी गावात ओळख होती. मागील काही वर्षे आजारपणामुळे ते वरवडे फणसनगर येथे आपल्या विवाहित मुलीकडे राहत होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या मृतदेहावर घोणसरी येथे ख्रिस्ती बांधवांच्या सिमित्री मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.फर्नांडिस गुरुजींच्या निधनाने घोणसरी गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चत 5 मुली,4 जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कणकवली प्रतिनिधी