राज्य महामंडळ कर्मचारी यांनी वेळप्रसंगी राज्याच्या तळागाळापर्यंत दिलेली सेवा कौतुकास्पद ! – डॉ.संजीव लिंगवत

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त अधिकारी, कर्मचारी व ग्राहक यांच्या वतीने करण्यात आले स्वागत

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गेली ७५ वर्षे अविरतपणे राज्यातील जनतेची सेवा करत असुन १जुन १९४८ रोजी महाराष्ट्र राज्यातील पहिली राज्य परिवहन महामंडळाची गाडी पुणे ते अहमदनगर मार्गावर धावली. राज्य महामंडळ कर्मचारी यांनी वेळप्रसंगी राज्याच्या तळागाळापर्यंत दिलेली सेवा कौतुकास्पद असून आम्ही त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो.” असे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या वेंगुर्ले शाखेचे अध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत यांनी आज राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्य परिवहन महामंडळ अधिकारी, कर्मचारी व ग्राहक यांच्या स्वागत प्रसंगी मत व्यक्त केले.

यावेळी उपस्थित वेंगुर्ले डेपो मॅनेजर राहुल कुंभार, वाहतूक निरीक्षक विशाल शेवाळे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक लालसिंग पवार, राज्य परिवहन महामंडळ वाहक चालक साई दाभोलकर, चालक एस्.एम्.सावंत, चालक आशीष खोबरेकर यांचे तसेच राज्य परिवहन महामंडळ ग्राहक प्रतिनिधी यांचे पुष्पगुच्छ देऊन ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा वेंगुर्ले व जनसेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.

यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र वेंगुर्लेचे तालुका अध्यक्ष व जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत, ग्राहक पंचायत महाराष्ट्र वेंगुर्लेचे सचिव संजय पाटील, सहसचिव व सातेरी महिला मंडळ तुळसच्या अध्यक्षा सुजाता पडवळ, ग्राहक पंचायत महाराष्ट्र सदस्य विश्वास पवार, सदस्य संजय वेंगुर्लेकर, सदस्या व साहस प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रुपाली पाटील व राज्य परिवहन ग्राहक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी पहिले चालक तुकाराम पांडुरंग पठारे व पहिले वाहक लक्ष्मण केले यांनी आदरांजली वाहण्यात आली व अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळविल्या बद्दल ग्राहक पंचायत महाराष्ट्र वेंगुर्ले शाखेच्या सहसचिव सुजाता पडवळ यांचे ग्राहक पंचायत महाराष्ट्र व जनसेवा प्रतिष्ठान यांच्या तर्फे अभिनंदन करण्यात आले.

सावंतवाडी: प्रतिनिधि

error: Content is protected !!