यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या कणकवलीच्या सुपत्राचा माजी नगराध्यक्षांच्या हस्ते गौरव

पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा
तुषार पवार च्या यशामुळे कणकवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा
अथक प्रयत्नांमधून यूपीएससी परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या कणकवलीच्या सुपुत्राचा कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सन्मान चिन्ह देत गौरव केला. कणकवली शहराच्या शिरपेचात तुषार पवार याच्या या यशामुळे अजून एक मानाचा तुरा रोवल्याचे गौरव उद्गार माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी याप्रसंगी काढले. कणकवली येथील श्री. नलावडे यांच्या संपर्क कार्यालयात हा सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, माजी नगरसेवक संजय कामतेकर, कविता राणे, चारुदत्त साटम, पंकज पेडणेकर, अभय राणे, सुशील पारकर, बाळा पाटील, गीतांजली कामत, किशोर राणे, आदि उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर/ कणकवली