कणकवली महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रम प्रवेशास प्रारंभ.

कणकवली/मयुर ठाकूर

विविध शाखांमधून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कणकवली कॉलेजमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या विविध विद्याशाखांसाठी प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. जे विद्यार्थी पदवीच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणार आहेत, त्यांच्यासाठी महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक शास्त्र, अकाउंट अँड फायनान्स व पदवीसह स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. सदर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना मुंबई विद्यापीठाच्या नियमानुसार प्रथमत: विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे.ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया दि.27 मे 2023 पासून प्रारंभ झाली असून, ही नोंदणी करण्याची सुविधा महाविद्यालयामध्ये करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी प्रथमतः ऑनलाइन नोंदणी करून महाविद्यालयातील विनंती प्रवेश अर्ज भरणे अनिवार्य आहे. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम दिनांक 12 जून 2023 असून, या तारखेपूर्वी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये येऊन आपला प्रवेश विनंती अर्ज जमा करणे आवश्यक आहे. प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!