हुमरमळा (वालावल) गावांमध्ये 50 लाख रुपयांच्या पाणी योजनांचा सरपंच अर्चना बंगे यांच्या हस्ते शुभारंभ
करमळीवाडी पेडणेकर, समर्थ नगर,पडोसवाडी गुंजकर वाडी, परकरवाडी मुख्य रस्ता लगत वाडयांचा समावेश
खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांचे मानले ग्रामस्थांनी जाहीर आभार
कुडाळ : हुमरमळा (वालावल) गावातील विकास कामांसाठी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून निधी प्राप्त होत असताना पाणि योजना पूर्ण करुन ग्रामस्थांच्या पाण्याची गैरसोय दूर होण्यासाठी सरपंच अर्चना बंगे यांच्या पाठपुराव्यामुळे ५० लाख रुपयांच्या निधिंच्या कामांचा शुभारंभ आज सरपंच अर्चना बंगे, उपसरपंच स्नेहल सामंत, जेष्ठ ग्रामस्थ प्रभु, ग्रामपंचायत सदस्या रमा गाळवणकर यांच्या शुभ हस्ते नुकताच संपन्न झाला. हुमरमळा (वालावल) गावांच्या विकास म्हणजे जिल्ह्यातील माॅडेल समजला जातो. अतुल बंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच अर्चना बंगे, उपसरपंच स्नेहल सामंत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने मागील वर्षात चांगली विकासकामे करुन ग्रामस्थांच्या मनामध्ये आपुलकीची भावना निर्माण केली आहे. अनेक विकासकामांबरोबर आज पडोसवाडी गुंजकरवाडी, करमळीवाडी पेडणेकरवाडी, समर्थ नगर, परकरवाडी रस्त्यालगत या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, ग्रामपंचायत सदस्या रमा गाळवणकर, ग्रामपंचायत सदस्या गिरीजा गुंजकर, युवासेना शाखा प्रमुख संदेश जाधव, युवासेनेचे मितेश वालावलकर, सतिश मांजरेकर, भिवा गुंजकर,भाऊ गुंजकर, ग्रामपंचायत सदस्य कांता माड्ये, दत्ता गुंजकर, पांडुरंग गुंजकर बबन हळदणकर, बाबल हळदणकर,उदय खडपकर, अजित केसरकर, सचिन पेडणेकर, परशुराम गुंजकर, पांडुरंग गुंजकर, सतिश मांजरेकर उपस्थित होते.
ब्युरो न्युज, कोकण नाऊ, कुडाळ