बौद्ध ऐक्यवर्धक मंडळाच्या वतीने कोंडये येथे संयुक्त जयंती महोत्सव

विविध कार्यक्रमांचे करण्यात आले आहे आयोजन
बौध्द ऐक्यवर्धक मंडळ (मुंबई) कोंडये याच्या विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सव शुक्रवार दि. १९ मे व शनिवार दि. २० मे २०२३ रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र, कोंडये बौध्दवाडी येथे आयोजित करण्यात आला असून यानिमित्त विविध धार्मिक,आरोग्य तपासणी शिबीर,रक्तदान शिबीर, डे नाईट अंडआर्म क्रिकेट स्पर्धा व जिल्हास्तरीय वैयक्तिक रेकॉर्ड डान्स स्पर्धा अशा विविध कार्यक्रमाचे भरगच्च आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त दि १९ मे सकाळी ९:३० ते १ माजी जि.प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत याच्या शुभहस्ते आरोग्य तपासणी शिबीर व मोफत औषध पुरवठा शुभारंभ, दु. २:३० वा. माजी सभापती मनोज रावराणे याच्या हस्ते डे नाईट अंडआर्म क्रिकेट स्पर्धा शुभारंभ होणार आहे. तसेच दि. २० मे सकाळी ८ वा. पंचशील ध्वजारोहण व पूजापाठ (बौध्दचार्य आयु. डि.के.जाधव),सकाळी ८:३० वा. रक्तदान शिबीर, दु. १:३० स्नेहभोजन, सायं ४ ते ६ महिला मेळावा व फनी गेम्स,सायं ७:३० ते १०:३० वा.स्नेहभोजन, रात्रौ ९ ते १०:३० वा अभिवादन सभा व सत्कार समारंभ, रात्रौ १०:३० वा जिल्हास्तरीय वैयक्तिक रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली असून लहान गटात प्रथम क्रमांक रू.३०००,व्दितीय रू.२५००, तृतीय रू.२००० व मोठया गटात प्रथम क्रमांक रू.५०००,व्दितीय रू.४०००, तृतीय रू.३५०० व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.अधिक माहितीसाठी विद्याधर तांबे ,शशिकांत तांबे ८८३०२४०७३७ यांच्याशी संपर्क साधावा.
या कार्यक्रमास सभाध्यक्ष अशोक तांबे,सरपंच ऋतुराज तेंडुलकर,उपसरपंच रविंद्र तेली,पोलीस पाटील संदेश मेस्त्री, अनिल तांबे, आण्णा तेंडुलकर,आनंद तांबे, भाऊ ठाकूर, बाळा धोपटे, दिलीप तेली, शांताराम जोईल, दिक्षा कदम आदी मान्यवर उपस्थित राहणार असून कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष आशोक तांबे, उपाध्यक्ष आनंद तांबे, सेक्रेटरी किशोर तांबे, खजिनदार राजे तांबे यानी केले आहे.
कणकवली प्रतिनिधी