ग्रामपंचायत वायंगणी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत वायंगणी येथे दि.16 मे 2023 रोजी सकाळी 8:30ते दुपारी 1 वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले होते. हे आरोग्य शिबीर वायंगणी गावातील सर्व महिला पुरुष यांच्या साठी ठेवण्यात आले होते.या आरोग्य तपासणी शिबिरात विविध प्रकारच्या रक्त चाचण्या, रक्तदाब,मधुमेह चाचणी,कोलेस्ट्रॉल, थायरॉइड,आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या.या शिबिरात गावातील महिला पुरुष लोकांनी उत्तम प्रतिसाद घेऊन या शिबिराचा लाभ घेतला.या शिबिरासाठी सुभाष मांडवकर-आरोग्य सहाय्यक ,रवींद्र नायकोजी-आरोग्य सेवक नडगीवे ,प्रणाली बाणे-CHO ,विद्या चव्हाण-लॅब टेक्निशियन, संजना कदम-आशा सेविका ,आदी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.तसेच वायंगणी सरपंच -अस्मि लाड, प्रताप फाटक-उपसरपंच, सदस्य-संभाजी बाणे,उज्जवला लाड,वनिता सुतार,भारती परब,भाग्यश्री बाणे आदी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
या मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजनाने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.

अस्मिता गिडाळे ,खारेपाटण

error: Content is protected !!