अज्ञात वाहनाच्या धडकेत पळसंब शाळेचे नुकसान

आचरा –अर्जुन बापर्डेकर
मंगळवारी पहाटे आचरा कणकवली रस्त्यालगत असलेल्या पळसंब येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस अज्ञात वाहनाची धडक बसून शाळेचे मोठे नुकसान झाले आहे.रस्त्या कडेला साधारण तीन ते चार फूट खाली असलेल्या शाळेच्या भिंतीला वाहनाची धडक बसूनही रात्रौच घटनास्थळावरून वहान हटविण्यात आल्याने वाहन समजू शकले नसले तरी
रात्रौ सुरू असलेल्या बेदरकार वाहतूकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत शासनाने कडक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
याबाबत पळसंब तलाठी यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.
याबाबत पंचनाम्यानुसार मंगळवारी पहाटे अंदाजे तीन वाजण्याच्या सुमारास आचरा रस्त्यावरून येणाऱ्या अज्ञात अवजड वाहनांची शाळेच्या इमारतीला धडक बसून शाळेचे मोठं नुकसान झालं.यात भिंतीचे सुमारे तीस हजार , कौलारू छपराचे अंदाजे २०हजार,खालची फरशी२०हजार असे मिळून अंदाजे ७०हजाराचे नुकसान झाल्याचे नमुद करण्यात आले.यावेळी पळसंब उपसरपंच अवीराज परब,शिक्षण विभागाचे उदय दिक्षित,शाळामुख्याध्यापक विनोद कदम, चंद्रकांत गोलतकर,रविकांत सावंत, दिनेश साहिल आदी उपस्थित होते.
धडकेनंतर वाहन पसार
मंगळवारी पहाटे रस्त्यापासून सुमारे तीन ते चार फूट खोल असलेल्या शाळेच्या इमारतीला अज्ञात वाहन धडकूनही घटनास्थळावरून वाहन पसार झाल्याचे बोलले जात होते.मात्र शासन आदेश डावलून बेदरकार पणे रात्री उशिरा सुरू असलेल्या अवजड वाहनांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शासनाने याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

error: Content is protected !!