ठाकरेंनी सोनिया गांधींच्या पायावर लोटांगण घातले ही लाचारी नव्हे का!

आमदार नितेश राणे यांचा खासदार संजय राऊत यांना सवाल
विधानसभा अध्यक्ष हे संविधान आणि कायदा या नुसारच प्रत्येक कारवाई करनार.सुप्रीम कोर्टाने जे नियम घालून दिलेले आहेत त्या नुसार निकालाचे कामकाज होणार. त्यामुळे मातोश्रीचा पोपट मेलेला आहे हे लवकरच अध्यक्ष जाहीर करतील असा प्रती टोला भाजपा आमदार नितेश राणे यांनी उ.बा.ठा.सेनेचे खासदार संजय राऊत यांना लगावला. तर आघाडीच्या काळात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे दिल्लीत सोनिया गांधींना भेटायला गेले होते,ते झाडू मारायला गेले होते काय ? असा सवाल करत संजय राऊत यांनी महाराष्ट्र दिल्लीचं पाय पुसन झाले आहे अशा केलेल्या टीकेला उत्तर दिले.
आमदार नितेश राणे म्हणाले, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आणि नातू दिल्लीत सोनिया गांधींना भेटून त्यांच्यासमोर नतमस्तक झालेले होते. साष्टांग दंडवत घालत आहेत त्याला पण काय म्हणायचं ? हे लाचारी नव्हे काय असावा नाही आमदार नितेश राणे यांनी केला. भारतीय जनता पार्टी हा एक राष्ट्रीय पक्ष आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि आम्ही सर्वजण एक मताने काम करत आहोत. सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या दहा जनपद वर जाऊन झाडू मारणे तुम्हाला वाईट वाटत नसेल तर आमच्यावर बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. असेही आमदार राणे यांनी सुनावले.
आमदार नितेश राणे मीडियाच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की २००४ ला मातोश्रीवर झालेल्या बैठकीत माजी सरचिटणीस अरुण बेतकेकर उपस्थित होते. ते याबाबत पुष्टी देऊ शकतात.मात्र आताच्या दंगली मध्ये उद्धवजी मास्टर माईंड आहेत का? याची चौकशी व्हावी. हा दंगलीचा प्लॅन आहे का? मुसलमान समाजात दंगली घडवून आपला मतदान वाढवायचं हा उद्धवजींचा प्लॅन परत एकदा होतोय का? हे अजित पवार साहेबांनी ओळखावं असे नितेश राणे म्हणाले.
आमदार नितेश राणे म्हणाले, मी वारंवार सांगतोय, दंगली घडवून स्वतः मुख्यमंत्री बनण्याची इच्छा ज्या सुप्त डोक्यातून आलेली. ती इच्छा आणि ते स्वप्न आजही मेलेलं नाही. उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करा हे मी सातत्याने सांगतोय. १९९३ च्या दंगलीनंतर १९९५ ला राज्यात सत्ता आली असं म्हणणारे ठाकरे २००४ ला परत तोच प्रयत्न करत होते.त्यामुळे त्याची चौकशी करा. अशी मागणी यावेळी नितेश राणे यांनी केली.
कणकवली प्रतिनिधी





