कोकण नाऊ सावंतवाडी महोत्सवाचे उद्या भव्य उद्घाटन.

सावंतवाडी/प्रतिनिधी.

कोकण नाऊ सावंतवाडी महोत्सव सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर होत आहे.यासाठी संपूर्ण जिमखाना मैदानात स्टोअर्स उभारण्यात आले आहेत.याचबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी भव्य व्यासपीठ सजवण्यात आल आहे.या महोत्सवाचे उद्घाटन माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून लखन राजे भोसले हे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर,माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह अनेक मान्यवर या महोत्सवास उपस्थित राहणार आहेत.
कोकण नाऊ चॅनेल च्या वतीने “कोकण नाऊ सावंतवाडी महोत्सव 2023” चे शानदार आयोजन करण्यात आल आहे.या महोत्सवात मालवणी जेवणाच्या खाद्यपदार्थांसहित आंतरराष्ट्रीय खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. तसेच विविध गृहपयोगी वस्तूंचे स्टोअर्स,तसेच लहान मुलांसाठी मनोरंजन जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे.या ठिकाणी भव्य असे आकाश झोपाळे,आकाश पाळणी,टोरा टोरा, ब्रेक डान्स त्याबरोबरच लहान मुलांसाठी खेळण्यासाठी विविध प्रकारचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.सावंतवाडीकरांसाठी ही मोठी मेजवानी ठरणार असून गेली कित्येक वर्ष सावंतवाडीत पर्यटन महोत्सव झाला नसल्याने या महोत्सवाची उत्कंठा सावंतवाडी शहरात शिगेला पोहोचली आहे.11 मे ते 21 मे असे 11 दिवस हा महोत्सव सुरु असणार असून यां महोत्सवाच्या दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या महोत्सवाच्या दरम्याने रेकॉर्ड डान्स स्पर्धा,सुगम संगीत स्पर्धा,काव्य संमेलन, फॅशन शो, खेळ पैठणीचा, दशवतारी नाटक,जादूचे प्रयोग तसेच सावंतवाडीतील विविध डान्स अकॅडमी च्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सावंतवाडीकरांसाठी ही सांस्कृतिक मेजवानी तब्बल 11 दिवस अनुभवायला मिळणार आहे तर सावंतवाडीतील जिमखाना मैदानावर संपूर्ण परिसर हा सजवण्यात आला असून या ठिकाणी 70 ते 80 स्टॉल पूर्ण झाले आहेत.या निमित्ताने या स्टॉल्स धारकांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
या महोत्सवास उद्घाटक – माजी आम. राजन तेली
प्रमुख उपस्थिती-
युवराज लखमराजे भोसले.
प्रमुख पाहुणे म्हणून
बबनराव साळगावकर(माजी नागराध्यक्ष)
संजू परब(माजी नगराध्यक्ष सावंतवाडी).
अर्चना घारे.(राष्ट्रीय काँग्रेस पार्टी कोकण विभाग महिलाध्यक्ष)

प्रशांत पानवलकर (प्रांतधिकारी.) अरुण उंडे (तहसीलदार)
हृषीकेश अधिकारी (पोलीस निरीक्षक).
अनामिका चव्हाण(बांधकाम अभियंता)

अशोक दळवी(शिवसेना जिल्हाप्रमुख)
रुपेश राऊळ (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख सावंतवाडी)
राजन पोकळे (माजी उपनगराध्य)
हरिश्चंद्र पवार(सावंतवाडी तालुका पत्रकार संघ अध्यक्ष)
सागर चव्हाण(संपादक दै कोकणसाद. चॅनेल)
शिवप्रसाद देसाई(दै सकाळ जिल्हा आवृत्ती प्रमुख)
गजानन नाईक(मराठी पत्रकार परिषद माजी अध्यक्ष )

पुंडलिक दळवी(तालुका अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पार्टी)
बबन राणे(शिवसेना शिंदे गट तालुका अध्यक्ष)
महेंद्र सांगेलकर(राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष)

पंकज पाटील (प्रशासकीय अधिकारी व्ही पी कॉलेज फार्मसी माडखोल )
विनायक जाधव (व्हरेनीयम क्लाउड लिमिटेड)
बुलंद पटेल (ज्ञानदा शिक्षण संस्था कणकवली कार्याध्यक्ष )
हे उपस्थित रहाणार आहेत.

दीपक केसरकर यांच्या कडून शुभेच्छा

सावंतवाडीचे आमदार दीपक भाई केसरकर यांनी कोकनं नाऊ च्या सावंतवाडी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या असून काही कारणामुळे ते भारताबाहेर जाणार असल्याने या कार्यक्रमास उद्घाटनास आपण उपस्थित राहणार नसलो तरी आपण बाहेर जाऊन आल्यानंतर नक्कीच या महोत्सवाला भेट देणार असून कोकण नाऊच्या महोत्सवाला आपल्या शुभेच्छा असल्याचं त्यांनी कळवलं आहे.

error: Content is protected !!