लक्ष्मीकांत कराड यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीमध्ये प्रवेश

श्री. कराड शिक्षक भारतीचे जिल्हा कार्याध्यक्ष

कराड सरांचा योग्य सन्मान करू – राजन कोरगावकर

प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : प्राथमिक शिक्षक समितीचे कार्य व सर्वसामान्य शिक्षक बांधवांवरील अन्यायाविरोधात आवाज उठविण्याच्या कार्यकुशलतेवर प्रभावित होऊन प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा जि प शाळा शेर्ले नं 1 ता सावंतवाडीचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक लक्ष्मीकांत विश्वंभर कराड यांनी सावंतवाडी येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीमध्ये जाहीर प्रवेश केला.
राज्यसरचिटणीस राजन कोरगावकर व जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, जिल्हासरचिटणीस सचिन मदने, माजी राज्य सहसचिव तथा पतपेढी अध्यक्ष नामदेव जांभवडेकर, पतपेढी संचालक दिनकर तळवणेकर, कुडाळ तालुका उमेदवार विजय सावंत, एकनाथ सावंत यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश झाला.
यावेळी प्राथमिक शिक्षक समिती सावंतवाडी तालुकाध्यक्ष समीर जाधव, सावंतवाडी तालुका उमेदवार गोविंद शेर्लेकर, जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत मडगावकर, तालुका शिक्षक नेते सतिश राऊळ, दिलीप चव्हाण, उदेश नाईक, मंगेश ठाकूर, अरविंद कुडतरकर, प्रसाद डेगवेकर, सुनिल जाधव आदी उपस्थित होते.
प्राथमिक शिक्षक समितीचा एक पाईक शिलेदार म्हणून आपण कार्यरत राहू, तसेच शिक्षकांना न्याय देणारी, नवनविन नेतृत्वाला संधी देणारी, सर्वसामान्य शिक्षक सभासदांमध्ये विश्वास निर्माण करणारी शिक्षक संघटना असल्याने आपण स्वेच्छेने शिक्षक समितीत प्रवेश करत असल्याचे श्री कराड यांनी स्पष्ट केले. श्री कराड सरांचा शिक्षक समितीमध्ये योग्य सन्मान केला जाईल असे राज्य सरचिटणीस श्री राजन कोरगावकर यांनी स्पष्ट केले.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.

error: Content is protected !!