गुरुवारी 11 मे रोजी मोंड येथे मोंडकर सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन

देवगड :
1978 साली स्थापन झालेल्या मुंडकर बंधू मोंडकर सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन गुरुवार दिनांक 11 मे रोजी मोंड देवघर येथे विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात येणार आहे.
मोंडकर बंधू सामाजिक संस्था मंडळाचे अध्यक्ष विलास बोंडकर सचिव हरिश्चंद्र मोंडकर खजिनदार सुरेश मोंडकर यांनी ही माहिती दिली आहे. यानिमित्त गुरुवारी सकाळी दहा वाजता सत्यनारायण महापूजा दुपारी दीड वाजता महाप्रसाद साडेचार वाजता लहान मुलांचे विविध स्पर्धा पर कार्यक्रम, सायंकाळी सहा वाजता हळदीकुंकू समारंभ, रात्र साडेसात वाजता रेकॉर्ड डान्स, रात्र नऊ वाजता मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरण सोहळा तसेच सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार असा कार्यक्रम आयोजनात आला आहे. रात्र दहा वाजता सुस्वर भजनांची डबलबारी सामना होणार आहे. खुडी देवगड येथील संतोष जोईल व कोटेश्वर नवतरुण मंडळाचे अभिषेक शिरसाट यांच्यात हा भजनाचा डबलबारी सामना होईल. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने हरिश्चंद्र मोंडकर यांनी केले आहे.