भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली निवड जाहीर

सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवड जाहीर केली आहे. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे काळसेकर यांनी पेलली होती. त्यानंतर लोकसभा प्रवास योजनेच्या प्रमुख पदाची जबाबदारी देखील देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा राज्य भाजपाची उपाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपवल्याने पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. श्री. काळसेकर यांच्यासोबत माधव भंडारी यांची देखील या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुपत्रांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!