शिक्षक समितीच्या जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल जाहीर

वेंगुर्लेचा कु कर्तव्य बांदिवडेकर प्रथम

१२० परीक्षा केंद्रांवर २०८० विद्यार्थी प्रविष्ट

सिंधुदुर्ग : प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेत वेंगुर्लेचा कु कर्तव्य बांदिवडेकर याने पहिला क्रमांक पटकावला आहे. सावंतवाडीचा कु दुर्वांक वालावलकर व दोडामार्गचा कु वेदांत पाटील व्दितीय तर देवगडची कु आर्या गावकर तृतीय जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत झळकले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इ 5 वी शिष्यवृत्तीचे २ हजार ८२ विद्यार्थी १२० परिक्षा केंद्रावर प्रविष्ट झाले होते. सुक्ष्म नियोजन व उत्तम दर्जाची सराव परिक्षा आयोजनामुळे जिल्ह्यातील पालक व शिक्षकांमधून सिंधुदुर्ग शिक्षक समितीचे कौतुक होत आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग आयोजित इ 5 वी शिष्यवृत्ती सराव परीक्षेत जिल्हास्तरीय टाॅप 10 गुणवत्ता यादीत प्रथम वेंगुर्ला वजराठ नं 1 शाळेचा कु कर्तव्य तेजस बांदिवडेकर (286 गुण) आला, द्वितीय सावंतवाडी नं 2 चा दुर्वांक किशोर वालावलकर( 260गुण) व वेदांत तुकाराम पाटील साटेली भेडशी दोडामार्ग आले तर देवगड साळशी नं 1 ची कु आर्या गावकर तृतीय आली. या सराव परीक्षेस जिल्ह्यातील एकाचवेळी सर्व तालुक्यात 120 परिक्षा केंद्रावर 2082 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.अशी माहिती जिल्हाध्यक्ष श्री नारायण नाईक व जिल्हासरचिटणीस श्री सचिन मदने यांनी दिली.
जिल्हास्तरीय टाॅप 10 गुणवत्ता यादीत चौथा गोपाळ जयवंत पवार कडावल नं 1 कुडाळ (250 गुण) व कु मुग्धा प्रशांत टोपले सावंतवाडी नं 2 (250 गुण),पाचवा रणवीर राजेंद्र शेळके सावंतवाडी नं 2 (248 गुण),सहावी कु प्रतिमा मिठबावकर सौंदाळे गावठण देवगड (246 गुण),सातवा ओम मुरली भणगे घोटगेवाडी दोडामार्ग (244) व देवेंद्र दिपक गावडे चौकुळ नं 5 नेनेवाडी सावंतवाडी (244 गुण),आठवा वेदिका जयवंत वजराठकर वेंगुर्ला( 242 गुण)व भाविका हेमंत भरणकर घोणसरी नं 5 कणकवली (242 गुण),नववा अजहर जाकीर शेख कासार्डे नं1 कणकवली (240गुण) व अनुष्का विभीषण चौगुले सर्जेकोट मिर्याबांध मालवण (240गुण),दहावा पूर्वा नरेश परब वजराट नं1 वेंगुर्ला (238 गुण) व स्वयम आपाजी पाटील सावंतवाडी नं( 2 238 गुण) यशस्वी झाले आहेत.

राज्याध्यक्ष उदय शिंदे यांची कणकवली परिक्षा केंद्राला भेट
त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन नियोजनासाठी शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष श्री उदय शिंदे हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना शिष्यवृत्ती सराव परीक्षेस कणकवली नं 5 केंद्रावर भेट देत उपक्रमाचे कौतुक केले.त्यांच्यासोबत राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, राज्य प्रवक्ता आबा शिंपी व राज्य संघटक सयाजी पाटील आदी उपस्थित होते.

उत्तम नियोजन व परिक्षेचा उत्तम दर्जा
सराव परीक्षेचे उत्तम नियोजन व परिक्षेचा उत्तम दर्जा यामुळे जिल्ह्यातील सर्व पालक व शिक्षकांमधून सिंधुदुर्ग शिक्षक समितीचे कौतुक होत आहे. सर्व तालुकाशाखांनी विद्यार्थ्यांची भोजन व्यवस्था परिक्षा केंद्रावर केली होती.

प्रश्नपत्रिका निर्मितीत मालवणच्या शिक्षकांचा सहभाग
सराव परिक्षेचे मराठी रामचंद्र कुबल आडवली नं 1,इंग्रजी मसुरे भोगलेवाडीच्या सौ श्रध्दा वाळके, बुध्दीमत्ता व गणित श्री संतोष नेरकर (आमडोस कदमवाडी),विलास सरनाईक नांदरुख आमडोस या शिक्षकांनी प्रश्नपत्रिका निर्मितीमध्ये सहभाग घेतला असून या शिक्षकांचेही विशेष कौतुक होत आहे.
परिक्षा परवानगी देण्यात निर्णय घेणारे सिंधुदुर्ग मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर व प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांचे शिक्षक समिती सिंधुदुर्ग च्यावतीने विशेष आभार मानण्यात आले.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.

error: Content is protected !!