वेंगुर्ला येथे डॉ. नंदन सामंत स्मृतीप्रित्यर्थ ज्ञान-अनुभव सोहळा ; जागतिक कीर्तीचे हृदयरोग शल्यविशारद डॉ. अनिल तेंडोलकर यांची प्रमुख उपस्थिती

डीएफसी सीएमईचे आयोजन ; रविवार ४ ऑक्टोबर रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

स्व. डॉ. नंदन सामंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वैद्यकीय ज्ञान, समृद्ध अनुभव आणि मनोरंजन यांचा अनोखा संगम असलेल्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून मधुसूदन कालेलकर एसी ऑडिटोरियम, कॅम्प, वेंगुर्ला येथे होणार आहे.

डीएफसी सिंधुदुर्ग आणि वर्किंग कमिटी, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच एसआरसी व एसआरडीसी, कुडाळ यांच्या सौजन्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी एमएमसी क्रेडिट पॉईंट्ससाठी अर्ज करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम केवळ वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांसाठीच नव्हे, तर वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठीही ज्ञान, अनुभव आणि मनोरंजनाचा अविस्मरणीय ठेवा ठरेल, असा विश्वास आयोजक डॉ. भरत मणचेकर आणि डॉ. विवेक रेडकर यांनी व्यक्त केला आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे मुंबईच्या केईएम व सायन रुग्णालयाचे माजी विभागप्रमुख आणि जागतिक कीर्तीचे हृदय शल्यविशारद डॉ. अनिल तेंडोलकर (एम.एस., एम.सीएच – सीव्हीटीएस) यांचे मार्गदर्शन व वक्तृत्व.

कार्यक्रमाची रूपरेषा अशी :

सायं. ५:१५ वा. – नोंदणी, चहा व अल्पोपहार
सायं. ५:३० वा. – उद्घाटन सोहळा
सायं. ५:४५ ते ६:१५ – क्लिनिकल मेडिसिन: द लॉस्ट आर्ट – वक्ते : डॉ. अनिल तेंडोलकर
सायं. ६:१५ ते ६:४५ – इन सर्च ऑफ रिसर्च: बियाँड हचिसन अँड हॅरिसन इन सिंधुदुर्ग – वक्ते : डॉ. विवेक रेडकर (एम.डी. जनरल मेडिसिन)
सायं. ६:४५ ते ७:१५ – डॉ. नंदन सामंत ओरेशन – विषय : द प्रोग्रेस इन मेडिसिन इज नॉट ड्यू टू डॉक्टर्स – वक्ते : डॉ. अनिल तेंडोलकर
सायं. ७:१५ ते ७:४५ – सत्कार व गौरव सोहळा – डॉ. अनिल तेंडोलकर यांचा सन्मान
सायं. ७:४५ ते ८:४५ – विशेष सांस्कृतिक आकर्षण : तुफान विनोदी एकपात्री प्रयोग “मी फजित वाडेकर” – सादरकर्ते : डॉ. अनिल तेंडोलकर
रात्री ९:०० पासून – स्नेहभोजन

नोंदणी प्रक्रिया

या कार्यक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून इच्छुकांनी https://forms.gle/yj8VkFQKwzoELvET6 या लिंकवर नोंदणी करावी.
नोंदणी विषयक अधिक माहितीसाठी डॉ. सुरेखा काळे (86008 08328) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन टीम वेंगुर्ला तर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!