सिंधुदुर्गात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे पक्षाचा मोर्चा

कणकवली विधानसभाप्रमुख सुशांत नाईकांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर धडक

निवडणूक विभागावरचा सर्वसामान्य जनतेचा विश्वास उडाला

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवलीत जोरदार आंदोलन करण्यात आले. कणकवली विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी प्रांताधिकारी कार्यालयावर धडक देत घोषणाबाजी केली. यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.
कणकवली शहरातील शिवसेना शाखेतून पदाधिकारी आणि शिवसैनिक एकत्र आले. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी आपला निषेध व्यक्त केला. हातात पक्षाचे झेंडे घेत कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला .
प्रांताधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची भेट घेतली. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे निवेदन त्यांच्याकडे सादर करण्यात आले. निवडणूक प्रक्रियेबाबत पक्षाच्या मनात असलेल्या आक्षेपांची माहिती यावेळी पदाधिकाऱ्यांनी प्रशासनासमोर मांडली.
यावेळी सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हतेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची असून, निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत नागरिकांचा विश्वास कायम राहणे आवश्यक असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या आंदोलनाला कणकवली तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी तसेच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी कणकवली तालुकाप्रमुख राजू राठोड, नगरसेवक संकेत नाईक, नगरसेवक जयेश धुमाळे, माजी युवासेना जिल्हाप्रमुख अॅड. हर्षद गावडे, उपतालुकाप्रमुख चेतन हुले, रुपेश आमडोसकर,महिला तालुकाप्रमुख माधवी दळवी, महिला तालुका प्रमुख वैदही गुडेकर, विभाग प्रमुख विलास गुडेकर, उपतालुकाप्रमुख राजू राणे, राजू शेटये, विभाग प्रमुख बाळा राऊत, विभाग प्रमुख तात्या निकम, विभाग प्रमुख सिद्धेश राणे, विभाग प्रमुख बबली राणे, विभाग प्रमुख गुरुनाथ पेडणेकर, तेजस राणे दिव्य साळगावकर, रोहिणी पिळणकर, संजना कोलते, अवि सावंत, हर्षद गावडे, विठोबा मर्ये, संदीप गावकर,उपस्थित होते.

error: Content is protected !!