कणकवलीत १ ऑक्टोबरला २० ज्येष्ठ नागरिकांचा ‘सहस्र चंद्र दर्शन’ सोहळा

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, कणकवलीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ८० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा ‘सहस्र चंद्र दर्शन’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार, १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता कणकवली येथील नवरे हॉस्पिटलसमोरील मातोश्री मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.
या सोहळ्यात कणकवली परिसरातील २० ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ कणकवलीचे विशेष सहकार्य लाभले आहे.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक, त्यांच्या कुटुंबीयांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!