कणकवली शहरात कल्याण मटका घेतल्याप्रकरणी एकावर गुन्हा

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कणकवलीत कारवाई

कणकवली शहरामध्ये मटका घेत असल्या प्रकरणी विशाल नंदकुमार धुमाळे (35 रा. पाटकीदेवी मंदिर) याच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्याकडून याप्रकरणी 12 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे कणकवली शहरातील मटका व्यवसाय पुन्हा एकदा सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही कारवाई आज दहा सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, नयोमी साटम, अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सुधीर सावंत, सहा पोलीस उप निरीक्षक राजु जामसंडेकर,सदानंद राणे, डॉमिनिक डिसोजा पोलीस हवालदार कदम यांच्या पथकाने केली आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!