मालवण समुद्रात मासेमारी करण्यास गेलेली बोट बुडाली दोघे बेपत्ता,एकाला वाचविले

मालवण सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात मासेमारी करत असताना ‘सागरिका’ ही मासेमारी नौका बुडाली आहे.मालवणच्या दांडी येथील नौका मालक सन्मेश सुरेश परब, त्यांचा मुलगा सुयोग सन्मेश परब आणि खलाशी अक्षय हनुमंत राणे हे तिघे ‘सागरिका’ या नौकेतून मासेमारीसाठी गेले होते.मात्र सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात मासेमारी करत असताना अचानक नौका बुडाली.या दुर्घटनेत सुयोग परब यांना जयदेव लोणे यांच्या नौकेने पाण्यातून सुखरूप बाहेर काढलं.मात्र दुर्दैवाने नौका मालक सन्मेश सुरेश परब आणि खलाशी अक्षय हनुमंत राणे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.दोन्ही मृतदेह सापडले असून, या दुर्घटनेमुळे मालवणच्या दांडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!