दीप अमवासेनिमित्तत्रिंबक रामेश्वर मंदिर दीप पूजन करण्यात

त्रिंबक रामेश्वर मंदिर येथे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग तर्फे दीप अमावस्येनिमित्त बुधवारी रात्री आठ वाजता दीप पूजन करण्यात आले. आपली हिंदू संस्कृती जपण्यासाठी व गडकिलल्यांची सेवा करणे हा उद्देश ठेवून हाउपक्रम राबवण्यात आला. यात त्रिंबक ग्रामस्थ तसेच कमिटी सदस्य
संहभागी झाले होते .यावेळी रामेश्वर मंदिर सभामंडप दिपज्योतींनी उजळून निघाला होता. या उपक्रमात गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान चे वरद जोशी, प्रसाद गुरव, स्वप्नील शिर्सेकर, विवेकानंद मेस्त्री, चंदन त्रिंबककर, चतुर त्रिंबककर, ओंकार गोसावी, हर्षद मडवळ, प्रथमेश चव्हाण, आकाश मेस्त्री, चंद्रकांत त्रिंबककर, हर्षद मेस्त्री, सोहम घाडीगावकर आदी मावळे आणि त्रिंबक ग्रामस्थ सहभागी झाले होते






