देवगड – दाजीपूर रस्त्याला सर्व जोड रस्ते जोडून द्या अन्यथा आंदोलन छेडणार

ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख व युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व पदाधिकाऱ्यांचा निखिल कंट्रक्शन कंपनीला इशारा

या रस्त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींनी कंपनीकडे मागणी करा अन्यथा वेळ गेल्यावर उपयोग नाही

देवगड दाजीपूर रस्त्याचे काम सुरू असताना या रस्त्याला जोडणारे सुमारे १०० जोड रस्ते आहेत. परंतु त्यातील १४ ते १५ जोड रस्त्यांचे काम निखिल कंस्ट्रक्शन करणार आहे. उर्वरीत जोड रस्ते ना दुरुस्त राहिल्यास नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे हे जोड रस्ते तातडीने करा याबाबत प्रत्येक ग्रामपंचायतीने तशी मागणी या कार्यालयाजवळ द्या अन्यथा ठेकेदार कंपनी आपले काम झाल्यानंतर नागरिकांना वाऱ्यावर सोडून जाईल. भविष्यात याचा त्रास येथील ग्रामस्थांना सहन करावा लागणार आहे. हे जोड रस्ते करून न दिल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आंदोलन छेडले जाईल व ग्रामस्थांच्या उद्रेकाला संबंधित ठेकेदार कंपनीला जबाबदार रहावे लागेल असा इशारा देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली विभाग प्रमुख व युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व पदाधिकाऱ्यांनी दिला. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने युवासेना जिल्हाप्रमुख तथा कणकवली विधानसभाप्रमुख सुशांत नाईक यांनी असलदे येथील MSIDC कार्यालयात भेट देऊन देवगड रस्त्यावरील सर्व जोड रस्त्यांचे काम ठेकेदार निखिल कंस्ट्रक्शन यांच्याकडून करून घेण्याची मागणी केली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी काम निकृष्ट दर्जाचे झाले असून अनेक ठिकाणी रस्त्यालगत मातीचे ढिगारे पडून आहेत. काही भागात पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी गटाराची व्यवस्था नसल्याने भविष्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.हे जोड रस्ते हायवेपासून १०० ते १५० फूट अप्रोच रोड झाले पाहिजेत. याकरिता असे रस्ते जोडणाऱ्या सर्वच ग्रामपंचायती व त्या सरपंचांनी संबंधित कंपनी किंवा प्रशासकीय कार्यालयात अशी मागणी करा आता संधी आहे ही दवडू नका. किंवा MSIDC ला पत्र यांनी दिले पाहिजे. आणि सगळे जोड रस्ते झाले पाहिजे असे कणकवली विधानसभाप्रमुख सुशांत नाईक यांनी सांगितले.यावेळी उपस्थित आबू मेस्त्री,रवींद्र जोगल,तात्या निकम ,
राजा नावलेकर,विष्णू सावंत,सुहास पवार,सचिन पवार,विक्रांत कदम,रमेश पवार,विक्रांत नाईक,दाजी सदडेकर उपस्थित होते.

error: Content is protected !!