निर्माल्यापासून खत निर्मितीचा डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अलिबाग रेवदंडा यांचा स्तुत्य उपक्रम आचरा गोल्डन बीच पिरावाडी येथे संपन्न..

या निर्माल्य संकलनातून वृक्षांसाठी खत निर्मिती केली जाणार असून धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री चिंदर ता मालवण येथील श्री सदस्यांनी दीड दिवस पाच दिवस सात दिवस अकरा दिवस बारा दिवसाच्या गणेश विसर्जनांचे निर्माल्य गोळा करून निस्वार्थ भावनेने ही सेवा बजावली आहे सर्व निर्माल्य संकलित करून त्यापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाणार असून ते खत झाडांसाठी वापरले जाणार आहे
निर्माल्याचा पूर्णपणे योग्य विल्हेवाट लावून त्यांचा पर्यावरण पूरक वापर करण्याचा हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात असून या उपक्रमाबाबत सर्व श्री सदस्यांचे व नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सर्व गणेश भक्तांनी व नागरिकांनी मनःपूर्वक आभार मानले
डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने फक्त निर्माल्य संकलनच नाही तर वृक्षारोपण वृक्ष संवर्धन रक्तदान शिबिर स्वच्छता अभियान शालोपयोगी वस्तूंचे वाटप असे विविध सामाजिक व पर्यावरण पूरक उपक्रम सातत्याने राबविले जात असून त्याबद्दल आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी प्रतिष्ठानच्या या उपक्रमा बाबत गौरवोद्गार काढले सदर उपक्रमास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातविले यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले .
या उपक्रमास ग्रामपंचायत आचरा सदस्य मुजफ्कर मुजावर महिला पोलीस उप निरीक्षक आचरा मिनाक्षी देसाई पो पाटील पिरावाडी तन्वी जोशी माजी सरपंच आचरा मंगेश टेमकर यानी भेट दिली या उपक्रमास ग्रामपंचायत आचराचे अनमोल सहकार्य लाभले

error: Content is protected !!