Views: 21
सावित्री सावंत प्रतिष्ठान आयोजित गणेश दर्शन व सजावट बाप्पा मोरया २०२६ स्पर्धेत सत्यविजय सावंत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.तर ओम इंदप, भुषण सावंत यांनी अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
सावित्री सावंत प्रतिष्ठान यांच्यावतीने कोळोशी येथील वरची वाडी येथील घरगुती गणेश दर्शन व सजावट स्पर्धा आयोजित केली होती.या स्पर्धेला स्पर्धकांचा चांगला प्रतिसाद लाभला.या स्पर्धेसाठी संकल्पना व नाविन्यता, पर्यावरण पुरकता, प्रकाश व रंगसंगती, स्वच्छता व सुरक्षितता,पारंपारिकता व सामाजिक संदेश या सर्व गोष्टिंचा विचार करत परिक्षक नागेश सावंत, परमानंद सावंत व शरद गावकर यांनी विजेते क्रमांक घोषित केले.यामध्ये सत्यविजय हरिश्चंद्र सावंत प्रथम क्रमांक व्दितीय क्रमांक ओम दिग्विजय इंदप, तृतीय भुषण वैभव सावंत, उत्तेजनार्थ लक्ष्मी वासुदेव इंदप व स्वरा उमेश इंदप विजेत्यांना अनुक्रमे १५००,१००१,७०१,३५१ रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.तर सहभागी स्पर्धकांना शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सावित्री सावंत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर सावंत, विश्वस्त उत्तम सावंत, परिक्षक नागेश सावंत, परमानंद सावंत,शरद गावकर, स्पर्धा व्यवस्थापक सुनील इंदप,संजय सावंत, उमेश इंदप,लक्ष्मी इंदप, भुषण सावंत, अनिल इंदप, सत्यविजय सावंत, पुजा कदम,काव्या सावंत, दिनेश इंदप, रणधीर इंदपआदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रथम क्रमांक विजेते दैनिक सामनाचे पत्रकार सत्यविजय सावंत म्हणाले की, आम्ही या स्पर्धेत गड किल्ले जतन, पर्यावरण रक्षण करणे असा देखावा साकारला.मात्र हे फक्त स्पर्धेपुरते मर्यादित नसून निसर्ग, संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी एक प्रयत्न आहे.तर दिनेश इंदप यांनी आपल्या प्रतिष्ठान कडून जी संधी आम्हाला उपलब्ध करून दिली हा एक स्तुत्य उपक्रम आहे.असे सांगत शुभेच्छा दिल्या.तर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर सावंत म्हणाले आमच्या कडून हा गणेश दर्शन व सजावट स्पर्धेचा पहिलाच उपक्रम होता.आपण सहभागी झालात त्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले त्या सर्वांना मनापासून आभार व्यक्त केले.