कणकवली शहराच्या विकासामध्ये मनोज धुमाळे यांचे मोठे योगदान

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे उद्गार

मनोज धुमाळे यांचा सेवानिवृत्ती पर समीर नलावडे यांच्या हस्ते सत्कार

कणकवली ग्रामपंचायत ते कणकवली नगरपंचायत या कणकवली शहराच्या प्रवासामध्ये मनोज धुमाळे यांनी केलेले काम हे कणकवली शहर कदापिही विसरणार नाही. कणकवली शहराच्या विकासामध्ये मनोज धुमाळे यांचा देखील नगरपंचायत च्या प्रशासनाच्या माध्यमातून मोठा वाटा आहे. असे उद्गार कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी काढले. मनोज धुमाळे हे नुकतेच कणकवली नगरपंचायत च्या सेवेमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांचा श्री नलावडे यांनी सत्कार केला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक माजी नगरसेवक बंडू गांगण राजू गवाणकर संदीप राणे राजा पाटकर नवराज झेमने आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!