रस्त्यालगतची झाडी तोडली नाही तर सा.बां. कार्यलयात ठिय्या !

वालावलच्या प.स. सदस्य सौ. अर्चना बंगे यांचा इशारा

वालावल पंचायत समिती मतदार संघात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली असुन येत्या चार दिवसात कारवाई न झाल्यास कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात ठीय्या आंदोलन करणार, असा इशारा वालावल पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांनी दिला आहे.
वालावल पंचायत समिती मतदार संघात नेरुर ते कवठी, वालावल ते हुमरमळा या दोन्ही रस्त्यांवर रस्ता लगत झाडी मोठ्या प्रमाणात वाढली असुन त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वारंवार मागणी करुन दुर्लक्ष केला जातो. म्हणून येत्या चार दिवसात सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळ यांनी झाडी तोडुन घेण्यासंदर्भात कार्यवाही केली नाही, तर या रस्त्यावरची टेम्पो भरुन झाडी कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात टाकुन ठिय्या आंदोलन करून लक्ष वेधले जाईल, असा इशारा सौ बंगे यांनी दिला आहे.

error: Content is protected !!